Ashok Saraf : अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्याशी चर्चा करून त्यांचे अभिनंदन केले. अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी सन 2023 चा मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Bhosari : सराईत वाहन चोरट्यास अटक; सात दुचाकी जप्त

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर खलनायकाच्या भूमिकेतूनही (Ashok Saraf) आपल्या अभिनयाची विशेष छाप उमटवली आहे. त्यांनी मराठी भाषेसह हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी कलाक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा महाराष्ट्रातील सर्वोच्च समजला जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.