Kothrud : रस्त्यावर असणारे धोकादायक वृक्ष कायमस्वरूपी काढण्यात यावे, अन्यथा स्थलांतरित करण्यात यावे – स्वप्नील दुधाने

एमपीसी न्यूज – रस्त्यावर असणारे (Kothrud) धोकादायक वृक्ष कायमस्वरूपी काढण्यात यावे, अन्यथा स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी केली आहे.

या वृक्षांमुळे अपघातांची संख्या वाढू नये, यासाठी प्रयत्नशील असणे, आवश्यक होते. याचसाठी सहाय्यक मनपा आयुक्त तथा वृक्ष अधिकारी, पुणे मनपा यांना निवेदन दिले. वारजे तपोधाम परिसरात अनेक मोठे वृक्ष मुख्य रस्त्यांवर वेडेवाकडे वाढले आहेत. त्यामुळे साहजिक अनेक अपघातांना आमंत्रण मिळत असून अनेक नागरिकांना नाहक आपले प्राण गमवावे लागत आहेत.

गेल्या तीन वर्षांत या रस्त्यावर या वेड्यावाकड्या वृक्षांमुळे अनेक अपघात झाले. काहीच दिवसांपूर्वी शुक्रवार, दि. 19 जानेवारी रोजी उमेश मारणे या तरुणाचा झाडाला धडक लागल्याने मृत्यू झाला. अशा वेळी मारणे कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली आणि तब्बल तीन लोकांचे प्राण वाचवले. परंतु, आता आपणही सामाजिक बांधिलकी जपत ही अपघातांची संख्या वाढू नये, यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक होते. याचसाठी सहाय्यक मनपा आयुक्त तथा वृक्ष अधिकारी, पुणे मनपा यांना निवेदन देऊन रस्त्यावर असणारे (Kothrud) धोकादायक वृक्ष कायमस्वरूपी काढण्यात यावे, अन्यथा स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी केली.

Talegaon : तिकिटाच्या सुट्या पैशांवरून पीएमपीएमएल बसमध्ये वाद

आज या अनुषंगाने @PMCPune चे वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य सहाय्यक मनपा आयुक्त तथा वृक्ष अधिकारी नायकल आणि या भागातील वृक्ष विभागाचे मिस्त्री डोळस यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती दिली. याप्रसंगी स्थानिक नागरिकांशी अधिकारी वर्गाचा संवाद घडवून आणला. आणि त्यांच्या सूचना लक्षात घेतल्या. यावेळी अधिकारी वर्गानेही सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचा शब्द दिला असून पुन्हा कोणालाही या ठिकाणी नाहक प्राण गमवावे लागू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, असे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.