Pimpri : माळ्यावर लपून बसलेल्या चोराने कोयत्याचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज – सहसा चोर येतो व कडी उचकटून (Pimpri) घरातील साहित्य चोरून नेतो. मात्र पिंपरीमध्ये एका चोरीत एक विचित्र प्रकार घडला. चोर घरात आला मात्र घरातून निघून न जातात तो घरातील माळ्यावर लपून बसला. घरातील माणसं परत आली व रात्रीची  कामे आटोपून झोपले असतात चोराने खाली उतरून त्यांना कोयत्याचा धाक दाखवला व त्यांना लुटले. हा प्रकार सोमवारी रात्री उशिरा पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी हर्ष उर्फ लड्या अमर बहोत (वय 19 रा पिंपरी) याला अटक केली आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्याच्या घराला कडी लावून शेजारी असलेल्या त्यांच्या सासूच्या घरी गेल्या. यावेळी आरोपीने घराची कडी उघडून घरात प्रवेश केला. मात्र तेथे चोरी न करता तो थेट घरातील माळ्यावर लपून बसला.  फिर्यादी व त्यांचे पती घरी आले व घरातील कामे करून ते झोपले असता पहाटे दोनच्या सुमारास आरोपी माळ्यावर खाली उतरला.
त्याने त्याच्या हातातील लोखंडी कोयताचा धाक दाखवून त्यांच्या पतीला जीवे मारण्याचे धमकी दिली.  तसेच फिर्यादीच्या नवऱ्याच्या पाकिटातून 2 हजार 300 रुपये काढून घेत पसार झाला. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील (Pimpri) तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.