Nigdi : निगडीतील ऑक्सिजन पार्कमध्ये 216 देशी वृक्षांचे रोपण

एमपीसी न्यूज –  निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 26  येथे ऑक्सिजन (Nigdi) पार्क उभारण्यात (Nigdi)आले आहे. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आज (शनिवारी)   या ऑक्सिजन पार्कमध्ये सुमारे 216  देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, उद्यान अधीक्षक राजेश वसावे, उद्यान पर्यावेक्षक संदीप गायकवाड, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर,  माजी नगरसेवक राजू मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, पर्यावरणप्रेमी धनंजय शेडबाळे, ऑक्सिजन पार्क रेसिडेन्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय नाईक, उपाध्यक्ष जयकुमार गुजर, सचिव धनंजय कदम, सदस्य सोनलकुमार सिंगी, विश्वजित हरूगडे, प्रशांत शेजवळ, हनुमंत रेडकर, देवेंद्र खडसे, संतोष मोरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या वृक्षारोपणात सहभाग घेतला.

Pimpri : माळ्यावर लपून बसलेल्या चोराने कोयत्याचा धाक दाखवून लुटले

ऑक्सिजन पार्क रेसिडेन्स असोसिएशन ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेने य आकुर्डी दूरध्वनी केंद्रासमोर असलेला 0.61 हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड महानगरपालिकेत हस्तांतरित करण्यात यावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले. अतिक्रमण आणि विध्वंसक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी (Nigdi) ऑक्सिजन पार्कच्या सभोवताली सीमाभिंती उभारण्यात आलेल्या असून वृक्षारोपणासाठी फुलपाखरे आणि पक्षी आकर्षित होतील; तसेच प्राणवायूचे जास्तीत जास्त प्रमाणात उत्सर्जन करतील अशा वृक्षांची निवड करण्यात आलेली आहे.

शहरीकरणामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे या उद्देशाने परिसरातील विविध गृहरचना संस्थांमधील जागरूक नागरिक एकत्र आले. त्यांनी नाशिक आणि अन्य ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन पार्कांना भेटी देऊन, अभ्यास करून प्रकल्पाची मागणी केली. त्याला लोकप्रतिनिधी आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या (Nigdi) आयुक्त, उपायुक्त यांच्यासह सर्वांनी सहकार्य केल्यामुळे एक आदर्श प्रकल्प कार्यान्वित झाल्याची भावना उपस्थिती नागरिकांनी यावेळी व्यक्त (Nigdi) केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.