Alandi : एमआयटी महाविद्यालयामध्ये कॉमर्स वीक व मीडिया रिफ्लेक्शन उत्साहात

एमपिसी न्यूज – आळंदीतील (Alandi) एमआयटी महाविद्यालय कला आणि वाणिज्य विभागाने दोन दिवसीय वार्षिक आंतरमहाविद्यालयीन प्रमुख कार्यक्रम ” कॉमर्स वीक आणि मीडिया रिफ्लेक्शनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अनेक महाविद्यालयांचा सहभाग लाभुन सुमारे 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांसाठी नोंदणी केली होती. या कार्यक्रमाचे उदघाटन चांद्रयान 3 लँडिंग साइट्स (दक्षिण ध्रुव ) साठी डिजिटल एलिवेशन निर्माण करण्यास ज्यांनी मोठी भूमिका बजावली अश्या श्रीमती एम विजया ज्योती यांच्या हस्ते झाले.

Pimpri : माळ्यावर लपून बसलेल्या चोराने कोयत्याचा धाक दाखवून लुटले

या प्रसंगी प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्य मानसी अतितकर, उपप्राचार्य अक्षदा कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. पद्मावती उंडाळे, सर्व विभागांचे प्रमुख, सर्व शिक्षक, विद्यार्थी समन्वयक, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

कला व वाणिज्य विभागाने विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण सूत्रे प्रधान करून त्यांना विविध क्षेत्रात त्यांचे मन मोकळे करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी कॉमर्स वीक व मीडिया रिफ्लेक्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाने विविध क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रम लाभवले.

शास्त्रज्ञ एम विजया ज्योती यांनी ज्ञानवर्धक शब्दांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून त्यांना उज्वल भविष्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. प्रवीण खरात, प्रा. सुरेखा गायकवाड व प्रा. पल्लवी घुगे यांनी केले तर विभागातील विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.