Rahatani : बनावट अ‍ॅप्लीकेशनद्वारे पैसे दिल्याचे भासवून व्यावसायिकाची 11 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज-  एका ग्राहकाने कपडे खरेदी करून स्वतःबद्दल खोटी माहिती देत एका (Rahatani ) बनावटअ‍ॅप्लीकेशनद्वारे पैसे भरल्याचे भासवून कापड व्यावसायिकाची 11 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना एक सप्टेंबर रोजी रहाटणी येथील भवानी कलेक्शन या दुकानांमध्ये घडली.

Alandi : एमआयटी महाविद्यालयामध्ये कॉमर्स वीक व मीडिया रिफ्लेक्शन उत्साहात

या प्रकरणी व्यावसायिकाने शुक्रवारी (दि.8) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून वाकड पोलिसांनी गणेश शंकर बोरसे (वय 34 रा लोहगाव)  याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुकानात काम करत असताना आरोपी तेथे खरेदीसाठी म्हणून आले. यावेळी त्यांनी त्यांच्याबद्दल खोटी माहिती व खोटा मोबाईल नंबर दिला खरेदी केलेल्या कपड्यांचे व रोख रक्कम असे मिळून एका खोट्या अ‍ॅप्लीकेशनद्वारे फिर्यादी यांना 11 हजार रुपये पाठवले.

 मात्र ही रक्कम आपल्या खात्यात आलीच नाही. हे लक्षात येताच फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . या प्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास (Rahatani ) करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.