Rahatani : जागा विक्रीच्या बहाण्याने 95 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज- जागा विक्रीच्या बहाण्याने एका ( Rahatani) व्यावसायिकाची 95 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 14 जुलै 2018 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जगताप डेअरी चौक, रहाटणी येथे घडली.

चैतन्य दिनेश शहा (वय 37, रा. डेक्कन, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश शंकरराव जुनवणे (वय 50, रा. जगताप डेअरी चौक, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahalunge : कंटेनरला दुचाकीची धडक; दोघे जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा गुंठे जागा विक्रीसाठी असल्याचे सुरेश जुनवणे याने फिर्यादी शहा यांना सांगितले. मात्र त्या जागेचा वाद सुरु असल्याचे त्याने शहा यांना सांगितले नाही. त्या जागेचा एक कोटी 80 लाख रुपयांना व्यवहार ठरवला. शहा यांनी व्यवहारातील 95 लाख रुपये जुनवणे यांना दिले.

मात्र त्यानंतर जागेचा व्यवहार पूर्ण करून न देता शहा यांनी दिलेल्या 95 लाख रुपयांची फसवणूक केली. ‘मी तुझे पैसे देणार नाही. तुला काय करायचे ते कर. तू जर परत इकडे दिसलास तर तुला मी काय आहे ते दाखवतो’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत ( Rahatani) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.