Mahalunge : कंटेनरला दुचाकीची धडक; दोघे जखमी

एमपीसी न्यूज –  कंटेनर चालकाने हयगयीने कंटेनर वळवल्याने पाठीमागून ( Mahalunge) जाणारी दुचाकी कंटेनरला धडकली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (दि. 28) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर कुरुळी येथे घडला.

ऋतिक गजानन मोहोळ (वय 23, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) आणि आशिष (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी ऋतिक यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangavi : भरधाव दुचाकीची बीआरटी डिव्हायडरला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋतिक आणि त्यांचा मावस भाऊ आशिष हे पुणे-नाशिक रोडने दुचाकीवरून जात होते. कुरुळी येथे आले असता त्यांच्या समोर जाणाऱ्या कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर अचानक वळवला.

त्यामुळे ऋतिक यांची दुचाकी कंटेनरला धडकली. त्यात आशिष हा गंभीर जखमी झाला तर ऋतिक हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत ( Mahalunge) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.