Sangavi : भरधाव दुचाकीची बीआरटी डिव्हायडरला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

एमपीसी न्यूज –  भरधाव दुचाकीची बीआरटी डिव्हायडरला धडक बसली. त्यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात 10 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वापाच वाजता कोकणे चौकाकडून पीके चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला.

संकेत राम माने (वय 25, रा. साई चौक, रा. रहाटणी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश भोंडवे (वय 35) हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत आणि आकाश हे दोघेजण दुचाकीवरून कोकणे चौकाकडून पी के चौकाकडे जात होते. संकेत हा दुचाकी चालवत होता. भरधाव दुचाकी चालवल्याने दुचाकीची बीआरटी डिव्हायडरला जोरात धडक बसली. या अपघातात संकेत याचा मृत्यू झाला. तर सहप्रवासी आकाश गंभीर जखमी झाला आहे. सांगवी पोलीस तपास करीत ( Sangavi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.