Alandi : किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून चार जणांनी ( Alandi) मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 28) मध्यरात्री देहूफाटा आळंदी येथे घडली.

प्रवीण सुखदेव जाधव (वय 40, रा. भोसरी), देविदास नामदेव गिरमे (वय 44, रा. भोसरी), हॉटेल चालक आणि इंद्रायणी हॉटेल मधील कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोज उद्धव घोडके (वय 27, रा. आळंदी-वडगाव रोड, ता. खे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Charholi : वीजबिल भरण्याच्या बहाण्याने स्क्रीन शेअर करत दोन लाखांची फसवणूकपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घोडके आणि त्यांचे मित्र शंभू मुळे हे मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता देहुफाटा आळंदी येथे इंद्रायणी हॉटेल मध्ये गेले. तिथे शंभू याला तंबाखू मिळाली नाही म्हणून त्याने हॉटेल चालकाशी वाद घातला. त्या कारणावरून हॉटेल चालक, हॉटेल मधील कामगार आणि दोघांनी मिळून फिर्यादी घोडके, त्यांचा मित्र शंभू यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत ( Alandi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.