Charholi : वीजबिल भरण्याच्या बहाण्याने स्क्रीन शेअर करत दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  वीज वितरण कंपनीतून बोलत ( Charholi) असल्याचे सांगून फोनवरील व्यक्तीने एकास वीजबिल भरण्यासाठी स्क्रीन शेअर ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याआधारे बँकेची गोपनीय माहिती घेऊन व्यक्तीच्या बँक खात्यातून एक लाख 92 हजार 370 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 30 सप्टेंबर 2023 रोजी चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

याप्रकरणी उज्वल आनंद (वय 38, रा. चऱ्होली) यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : बनावट पार्ट विक्री केल्या प्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज याने फिर्यादी उज्वल यांना फोन केला. पंकज याने तो वीज वितरण कंपनीतून बोलत असल्याचे सांगून उज्वल यांचे वीजबिल भरण्यासाठी त्याने एनीटाईम डेस्क हे स्क्रीन शेअरिंग ॲप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले.

उज्वल यांनी ते ॲप डाऊनलोड केले असता त्यांच्या फोनची स्क्रीन पंकज याने त्याच्याशी शेअर करण्यास सांगत त्याद्वारे उज्वल यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे उज्वल यांच्या बँक खात्यातून एक लाख 92 हजार 370 रुपये काढून घेत फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत ( Charholi)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.