Chikhali : बनावट पार्ट विक्री केल्या प्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीचे बनावट पार्ट दुकानात विक्रीसाठी ( Chikhali ) ठेवले. याप्रकरणी चिखली मधील दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 28) दुपारी कुदळवाडी आणि पूर्णानगर चिखली येथे करण्यात आली.

गणेश नागेश गोरतळे (वय 32, रा. चिखली), बालाजी प्रेमनाथ उबाळे (वय 30, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या दुकानदारांची नावे आहेत. याप्रकरणी बॉश कंपनीचे कमलेश पायगुडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : इंद्रायणी नदीमधील प्रदूषण होणार कमी, ‘ईटीपी’ कार्यान्वित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गोरतळे याने त्याच्या अली भाई अँड सन्स या दुकानात पाच लाख 52 हजार रुपये किमतीचे बॉश कंपनीचे 1840 नग बनावट ग्लो प्लग विक्रीसाठी ठेवले. तर बालाजी उबाळे याने त्याच्या बालाजी एंटरप्रायजेस या दुकानात 9 हजार 860 रुपये किमतीचे 170 नग बनावट व्हील सिलेंडर किट विक्रीसाठी ठेवले. याबाबत कंपनीला माहिती मिळाल्यानंतर कंपनीकडून तक्रार देण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत ( Chikhali ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.