Chikhali : चिखलीमधील राहुल यादव टोळीवर मोका

एमपीसी न्यूज – चिखली परिसरात वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी (Chikhali) गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे करणाऱ्या राहुल यादव टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

टोळी प्रमुख राहुल प्रल्हाद यादव (वय 32, रां. कुदळवाडी, चिखली), नागेश गुलचंद सूर्यवंशी (वय 28, रा. सोळू, ता. खेड), रोहन भानुदास यादव (वय 21, रा. चिखली), आशिष भीमराव बजलव (वय 27, रा. कुदळवाडी, चिखली), राजेश बहरीच निसाद (वय 32, रा. कुदळवाडी, चिखली) अशी मोका कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Alandi : किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण

सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल यादव आणि त्याच्या साथीदारांवर मागील वर्षी चिखली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली. राहुल यादव याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून आळंदी आणि चिखली परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी, बेकायदेशीर जीवघेणी हत्यार बाळगणे असे सात गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व आणि दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी आरोपींनी हे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी चिखली पोलिसांनी प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावावर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चार गुन्हेगारी टोळ्यांमधील 24 गुन्हेगारांवर मोकाची कारवाई केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात (Chikhali) येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.