Kartiki Ekadashi : उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा…

एमपीसी न्यूज : पिंपळे गुरव गावाचे (Kartiki Ekadashi) ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळ आणि पिंपळे गुरव ग्रामस्थ यांच्या वतीने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अन् अखंड हरिनाम संकीर्तन यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळाचे यंदाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त कीर्तनमहोत्सव, पारायण, महिलांचे भजन, नित्यनेमाने हरिपाठ पहाटेची काकड आरती असे भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळाने आणि ग्रामस्थांनी आयोजित केले आहेत.

समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. जयवंत देवकर आणि उपाध्यक्ष ह.भ. प. मारुती जांभूळकर आहेत.

Chinchwad news : वाल्हेकरवाडी-स्पाईन रस्ता ते सांगवी-किवळे रुंदीकरणाला अखेर ‘गती’

मानवी जीवनात सत्संगाचे महत्त्व खूप मोठे आहे. सत्संग आपल्याला विवेक शिकवतो. यासाठी पिंपळे गुरव गावात प्रतिवर्षी नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन केले जाते. पिंपळे गुरव येथील नागरिकांचा सक्रीय सहभाग लाभतो. युवापिढीला भजन, कीर्तन, तबला, पेटी शिकविण्यासाठी गावातील ज्येष्ठ हरिभक्त नियमित मार्गदर्शन करतात. संतांच्या पुण्यतिथी, दर गुरुवार, शनिवार, एकादशीला मंदिरात भजन होते.

श्रावण महिन्यात महिनाभर सामूहिक हरिपाठ घेण्यात येतो. महिलांचा (Kartiki Ekadashi) मोठा सहभाग असतो. समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळाचे सर्व सदस्य आध्यात्मिक अन् सामाजिक कार्य करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रतिवर्षी अध्यात्म आणि चिंतनाची शिदोरी इथल्या भक्तगणांना देत असतात. पिंपळे गुरव येथील भैरवनाथ मंदिरात कोजागिरी पर्यंत चालणाऱ्या या भक्तिपूर्ण सोहळ्याला सर्व भाविकांनी यावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष जयवंत देवकर आणि मारुती जांभुळकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.