Traffic issue : वाहतूक कोंडीवरून होणारी टीका; दोन्ही आयुक्त ‘ऑन दी स्पॉट’

एमपीसी न्यूज : शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवरून मागील काही दिवसांपासून पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर शहरातील ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे पोलीस आयुक्तांनी आणि महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे.(Traffic issue) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज एकत्रितरित्या शहरातील विविध मार्गांची पाहणी केली. याशिवाय उपस्थित अधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट काही सूचना केल्या आहेत. या व्यतिरिक्त विनाकारण रस्ते अडवणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही दोन्ही आयुक्तांनी यावेळी दिले आहेत. 

दिवाळीच्या कालावधीत आणि पावसाळ्यात शहरातील बहुतांश रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. इतकेच नाही तर अनेक रस्ते मुसळधार पावसानंतर पाण्याखाली गेले होते. (Traffic issue) शहरात सुरू असणाऱ्या खोदकामामुळे अनेक रस्ते खड्डेमय झाल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. यावरून पोलीस प्रशासनावर सर्व स्तरातून टीका केली जात होती. त्यानंतर आता ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त या दोघांनी पुढाकार घेतला आहे.

Kartiki Ekadashi : उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा…

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या आरोपांची गंभीर दाखल घेतली. वाहतूक विभागाची जबाबदारी आणखी एका पोलिस आयुक्तावर सोपवली तर विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही वाहतूक कामे मदत करण्याचे आदेश दिले आहेत. (Traffic issue) तर महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनीही पाऊस उघडताच शहरातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. शिवाय विविध संस्थांच्या माध्यमातून भाग देऊन अधिक त्राफिक वार्डन उपलब्ध करून दिले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी शहारात सुरू असलेल्या विविध प्रकल्पाची पाहणी केली. दोन्ही आयुक्त संयुक्तरित्या दौरा करणार असल्याने अतिक्रमण विभागाची पथके दिसून आली. मागील काही महिन्यांपासून अभूतपूर्व असा पाऊस होत होता.(Traffic issue) त्यामुळे पोलीस प्रशासन आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलत होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सकाळी खराडी आणि जेल रोड परिसरातील रस्त्यांची पहाणी केली. यानंतर त्यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत गणेश खिंड रस्ता, पुणे विद्यापीठ चौक, बाणेर, चांदणी चौक, नवले पूल आणि सिंहगड रस्ता परिसरात दोघांनी पाहणी केली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. शहरातील मेट्रोच्या कामाचा आणि उड्डाण पुलाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.