Kelgaon News : केळगाव शाळेतील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

एमपीसी न्यूज -जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा केळगाव येथील दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या कडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती (Kelgaon News) परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. अशी माहिती शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता भगत यांनी दिली.
शाळेच्या इतिहासात प्रथमच शिष्यवृत्तीची उज्वल परंपरा निर्मितीचे मानकरी होण्याची संधी आदेश कुडकेकर (264 गुण) व आदित्य  बागडे (244 गुण) या गुणवंत विद्यार्थ्यांना मिळाली. यशस्वी विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षिका मनीषा  मटाले यांनी मार्गदर्शन केले. प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता भगत, मधुकर आढारी, अलका रहाणे, नेहा लगड, स्मिता तावरे, शरद कुऱ्हाडे आदी शिक्षकांचे (Kelgaon News) सहकार्य लाभले.तसेच यावेळी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका स्तरावर उंच उडी स्पर्धेमध्ये तुकाराम  पिंपळे (इयत्ता सातवी) याने प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

शाळेतील क्रीडा व   यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे प्र. केंद्रप्रमुख नामदेव गायकवाड , चाकण बीटचे विस्ताराधिकारी गोडसे साहेब, गटशिक्षणाधिकारी  जीवन कोकणे साहेब ,  सरपंच गुंफाताई ठाकर, उपसरपंच लताबाई वीरकर तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती (Kelgaon News) अध्यक्ष  विठ्ठल मुंगसे, उपाध्यक्ष अर्चना म्हस्के व सर्व सदस्य, ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले.गुणवंत विद्यार्थ्यांवर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.