Kelgaon : केळगावमध्ये बिबट्याचा शेळी आणि मेंढीवर हल्ला

एमपीसी न्यूज : केळगाव येथील डोंगराच्या जवळील (Kelgaon) माळरानात गंगाधर दगडे (धनगर) आपल्या मेंढ्या व शेळ्यासह गेल्या दहा पंधरा दिवसापासून राहत आहेत. आज पहाटेच्या वेळी तिथे बिबट्याने 2 मेंढ्यावर व एका शेळीवर हल्ला केला. त्यातील 1 मेंढी व 1 शेळी मरण पावली आहे.

एका मेंढीला बिबट्याचे दात लागून जखम झाली आहे. गंगाधर दगडे धनगर हे दिवाळीपासून केळगावमध्ये विविध ठिकाणी शेतात राहत आहेत.

Akurdi : मराठा सेवा संघातर्फे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण गुणवंताचा सन्मान

बिबट्यासाठी पिंजराही सायंकाळी आणण्यात आला आहे. याबाबत माहिती गंगाधर दगडे, शिवाजी मुंगसे (मा.उपसरपंच), दीपक मुंगसे, लहू मुंगसे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.