Alandi : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ व मी सेवेकरी सोशल फाउंडेशन तर्फे नदी संवर्धन जनजागृती व स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज : आज 9 ,मार्च रोजी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे (Alandi) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मी सेवेकरी सोशल फाउंडेशन, केळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी नदी संवर्धन जनजागृती व स्वच्छता मोहीम आयोजीत करण्यात आली. प्रथम आळंदी नगरपरिषद ते चाकण चौक इंद्रायणी नदी संवर्धन जनजागृती रॅली ही टाळ, मृदुंगाच्या व हरिनामाच्या गजरात काढण्यात आली. व रॅलीत नदी जल प्रदूषण होऊ नये यासाठी घोषणा देण्यात आल्या. या रॅलीचे उद्घाटन माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

जब नदिया रहेगी तभी तो हमारी कल की जिंदगी रहेगी | अपने अंदर ये जोश भरो, नदियो को अब साफ करो | नदी है तो पाणी है, पाणी है तो जीवन है | जब नदीयों को बचाओगे तभी समझदार कहलाओगे | पुढील पिढीसाठी चांगली देन माझा परिसर स्वच्छ ठेवेन, पाण्याचे कराल संरक्षण, वसुंधरेचे होईल रक्षण असे विद्यार्थ्यांच्या हातातील फलक नागरिकांचे लक्ष वेधत होते.

माजी आमदार विलास लांडे यांनी नदीमध्ये जलप्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शन केले. तसेच पूर्वीची नदी व सद्यस्थितीतील नदी या विषयी माहिती दिली. तसेच ते यावेळी म्हणाले, पुण्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषित नदी कोणती असेल तर ती पवना नदी.

Talegaon Dabhade : स्त्रियांनी जबाबदारी आणि कर्तव्याला सामोरे जावे – ॲड. नीलिमा वर्तक 

मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे सुधीर मुंगसे यावेळी म्हणाले, इंद्रायणी नदीचे पाणी 1975 मध्ये पिण्याजोगे होते व सद्यस्थितीत इंद्रायणी नदीतील पाणी रासायनिक युक्त व इतर प्रदूषनाने जल प्रदूषित होऊन ते पिण्या योग्य राहिले नाही. इंद्रायणी नदी जल प्रदूषणाकडे शासनाचे लक्ष जावे यासाठी हा प्रयत्न आहे. व दर तीन महिन्यांनी हा उपक्रम राबवणार आहोत.

या उपक्रमा द्वारे सर्वत्र नदीचे संवर्धनेचा संदेश मिळून समाजात त्या विषयी जनजागृती होईल. इंद्रायणी फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे यांनी  मी सेवेकरी फाउंडेशन तर्फे नदी स्वच्छते बाबतचे प्रयत्न चालू आहे यासाठी त्यांचे आभार मानले.

मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्या नंतर इंद्रायणी घाटा वरील स्वच्छतेला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी (Alandi) व मी सेवेकरी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी इंद्रायणी घाटाची स्वच्छता केली.

तसेच यावेळी आळंदी नगरपरिषद आरोग्य विभाग व अग्निशमन दल यांचे या स्वच्छता कार्यास सहकार्य लाभले. यावेळी विक्रम लांडे,  हनुमंत शास्त्री, डॉ. सुनील वाघमारे, सावत्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संलग्नित राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षकवर्ग, वारकरी संप्रदायातील विद्यार्थी, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.