Talegaon Dabhade : स्त्रियांनी जबाबदारी आणि कर्तव्याला सामोरे जावे – ॲड. नीलिमा वर्तक 

एमपीसी न्यूज – बदलत्या काळानुसार स्त्रियांनी न डगमगता समर्थपणे (Talegaon Dabhade)आपल्या जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडावीत. महिलांनी स्वतः आपल्या सबलीकरणासाठी जागरूक रहावे असे मत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नीलिमा वर्तक यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वर्तक बोलत होत्या.
याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, सदस्या निरुपा (Talegaon Dabhade)कानीटकर, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश शिंदे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेश पाटील, उपप्राचार्य एस.पी. भोसले आदी मान्यवर उपस्थित होत.

Bhopal: भोपाळमध्ये मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सदस्या निरूपा कानीटकर यांनी केले. महिलांनी भ्रामक जगाचे अनुकरण न करता स्वतःच्या विचारसरणीचा अवलंब करीत वर्तन करावे व आपले छंद जोपासत शरीरस्वास्थ्य जपावे असा सल्ला यावेळी सौ. कानिटकर यांनी दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत शेटे म्हणाले की, कर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी प्रगतीची उंच भरारी घेतली पाहिजे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सर्व महिला अध्यापीकांना पालक म्हणून आपण सदैव सोबत असण्याचा आश्वासक सल्ला यावेळी श्री.शेटे यांनी दिला.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सर्व प्राध्यापकांच्या मदतीने करण्यात आले होते. याप्रसंगी विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अर्चना जाधव व प्रा. राधा गोहाड यांनी केले तर आभार प्रा. हुलावळे मॅडम यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.