Chakan : महिलेला मारहाण करत सोनसाखळी व रोख रक्कम असा दिड लाखांचा ऐवज हिसकावणाऱ्या चोराला अटक

एमपीसी न्यूज – महिलेला मारहाण (Chakan) करत तिच्या गळ्यातील सोनसाखळी व रोख रक्कम हिसकावून नेणाऱ्या चोराला गुरुवारी (दि.7) शेल पिंपळगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून सचिन किसन मोहिते (रा. शेलपिंपळगाव, खेड) याला अटक कऱण्यात आला आहे.

Alandi : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ व मी सेवेकरी सोशल फाउंडेशन तर्फे नदी संवर्धन जनजागृती व स्वच्छता मोहीम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दुचाकीवरून जात असताना आरोपीने पाठीमागून येत गळ्यातील 1 लाख 25 हजार रुपयांचे 27.810 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी ओढून घेतली. यावेली फिर्यादी यांनी त्याला (Chakan) विरोध करत असताना आरोपीने फिर्यादीच्या खिशातून 30 हजार रुपये काढून घेतले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.