Sangvi : महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेच्या गळ्यातील 11 ग्रॅम वजनाची (Sangvi) सोनसाखळी चोरण्यात आली आहे. ही घटना विशालनगर, सांगवी येथे घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. यावरून सागर सुभाष वैरागे, विकास साहेबराव वैरागे, आशिष रमेश वैरागे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : महिलेला मारहाण करत सोनसाखळी व रोख रक्कम असा दिड लाखांचा ऐवज हिसकावणाऱ्या चोराला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 11.190 ग्रॅम (Sangvi) वजनाची 34 हजार 944 रुपयांची सोनसाखळी आरोपीने लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.