Akurdi : मराठा सेवा संघातर्फे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण गुणवंताचा सन्मान

एमपीसी न्यूज – मराठा सेवा संघाच्या वतीने आकुर्डी येथील (Akurdi) जिजाऊ सभागृहात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. जिजाऊ ब्रिगेडच्या शालन घाटुळ व अश्विनी पाटील यांनी जिजाऊ वंदना सादर केली. यावेळी एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या राजकिरण डोके (पोलिस उपनिरीक्षक), श्रृती मालपोटे (पोलिस उपनिरीक्षक), माधुरी किरवे (पोलिस उपनिरीक्षक), अजिंक्य बवले (कामगार अधिकारी क्लास 2), तसेच उत्कृष्ठ क्रीडा खेळाडू आदित्य शिंदे (व्यवसायिक कबड्डी) यांचा सत्कार करण्यात आला.

मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, मराठा सेवा संघ पुणे जिल्हा माजी अध्यक्ष राजेंद्र कुंजीर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश संपर्क प्रमुख अनिल ताडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे, कल्पना गिड्डे, गणेश दहिभाते, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतिश काळे उपस्थित होते.

यावेळी सर्व सत्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. मराठा सेवा संघाने दखल घेऊन (Akurdi ) सत्कार केला. याबद्दल समाधान व्यक्त केले. समाजास अभिमान वाटेल असे प्रशासनात काम करू, असे आश्वासन दिले. आपल्या प्रास्ताविक मनोगतात मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे म्हणाले की, मराठा सेवा संघ नेहमीच गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहतो.

भावी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार कार्यक्रम आयोजित करतो.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार यांनी अत्यंत प्रतिकुल प्ररिस्थितीत यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा माजी अध्यक्ष राजेंद्र कुंजीर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण गुणवंतांना तुम्ही जरी यश प्राप्त केले असले. तरी आपल्या समाजातील गोरगरीब वंचित मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करा. ‘पे बॅक टू सोसायटी’ या तत्वाप्रमाणे वागून इतर तरुण तरुणींना सर्वप्रकारची मदत करावी, असे आवाहन केले.

मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी अध्यक्षीय मनोगतात सर्व सत्कारार्थी गुणवंतांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. कोणत्याही अमिषाला, दबावाला बळी न पडता सर्व नवनियुक्त अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रशासकीय सेवेत सर्वसामान्यांना, अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा असे अवाहन केले. सध्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे.

Eknath Shinde : पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री शिंदे कुटुंबियांसोबत सदिच्छा भेट; तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची चर्चा

महिलांवर, मुलींवर अत्याचार होत आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे प्रस्तापितांकडून शोषण केले जात आहेत. यापासून समाजाला वाचविण्यासाठी संविधानाच्या मार्गाने कायद्याप्रमाणे चांगले काम करा. जेणे करून पुढच्या अनेक पिढ्यांनी तुमच्या प्रशासकीय सेवेतील कार्याचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक गणेश दहिभाते यांनी केले, तर जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे, हेमा ग्यानी, प्रकाश बाबर, शितल घरत, अशोक सातपुते, सुभाष देसाई, सुरेश इंगळे, शरद मालपोटे, अश्विनी पाटील, किरण खोत, शालन घाटुळ, वाल्मिक माने, संपतराव जगताप यांनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.