Eknath Shinde : पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री शिंदे कुटुंबियांसोबत सदिच्छा भेट; तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची चर्चा

एमपीसी न्यूज : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या कुटुंबियांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे, त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आणि सून तसेच नातू यांच्यासह सदिच्छा भेटीला बोलावले होते. तसेच यावेळी त्यांनी आपलेपणाने विचारपूस केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तर गृहमंत्री अमित शाह यांना देखील एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब भेट दिली. 

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. याबाबत एकनाथ शिंदे यांनी माहिती देताना म्हंटले, की  पंतप्रधान मोदी यांनी व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली.

इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली. धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे.

त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो.

त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आस्थेवाईकपणे चर्चा केली.

Chinchwad Murder : अपहरण झालेल्या 70 वर्षीय बँक मॅनेजरचा खून; अटक आरोपीने दिली कबुली

कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध (Eknath Shinde) शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली

गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले तसेच पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

गृहमंत्री अमित शाह यांची भेट –

तर, गृहमंत्री अमित शाह यांनीही शिंदे यांची सहकुटुंब भेट घेतली. यावेळी  राज्यातील विविध प्रश्न आणि विकासकामांबाबत आम्ही साधकबाधक चर्चा केली. अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात केंद्र सरकारचे कायम पाठबळ असेल अशी ग्वाही  दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.