Chinchwad Murder : अपहरण झालेल्या 70 वर्षीय निवृत्त बँक मॅनेजरचा खून; अटक आरोपीने दिली कबुली

तर ताम्हीणी घाटात सापडला मृतदेह

एमपीसी न्यूज – पैशाचा तगादा लावला म्हणून 70 वर्षीय निवृत्त बँक मॅनेजरचे (Chinchwad Murder) अपहरण करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली आहे. खून करून आरोपींनी ताम्हीणी घाटात त्य़ा मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 2 व चिंचवड पोलीस यांनी आरोपींना बेड्य़ा ठोकल्या आहेत.

रणजित मेला सिंग (वय 70 रा. वाघोली, पुणे) असे मयत नागरिकाचे नाव असून ते पंजाब सिंध बँकेत मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. आत्तापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी नारायण बाबुराव इंगळे (वय 46 रा.चिंचवडगाव) याला पोलिसांनी आधीच अटक केले होते.

तर, सुपारी घेऊन खून करणारे आरोपी राजेश नारायण पवार, समाधान ज्ञानोबा म्हस्के (दोघे रा. चिखली) यांना सापळा रचून चिखली घरकूल परिसरातून गुन्हे युनीट शाखा दोनच्या पथकाने अटक केली.

याप्रकऱणी चिंचवड पोलीस ठाण्यात सिंग यांचे जावई आदित्य पाकलपाटी (वय 39, रा.हैद्राबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, नारायण इंगळे याने रणजीत सिंग यांच्याकडून 30 लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे परत दे म्हणून सिंग यांनी नारायण इंगळे याच्याकडे सतत तगादा लावला. नारायण इंगळे याला ते पैसे परत द्यायचे नव्हते.

यासाठी त्याने सिंग यांना संपवण्याचाच कट आखला. यासाठी त्याने त्याचे मित्र राजेश व समाधान यांना हाताशी घेतले व त्यांना सिंग यांच्या खूनासाठी 4 लाख रुपयांची सुपारी दिली.

कटानुसार सिंग यांना 19 जुलै रोजी इंगळे याने चिंचवड येथील त्याच्या राहत्या घरी (Chinchwad Murder) पैसे देतो म्हणून बोलावून घेतले. ते घरी आल्यानंतर त्यांच्या सोबत बोलत असताना इंगळे व राजेश यांनी मागून येऊन सिंग यांचा दोरीने गळा आवळून व समाधान म्हस्के याने चाकूने चार ते पाच वेळा भोकसून ठार मारले.

सुरुवातीला आरोपींनी एकमेकांना ओळखत नसल्याचा बहाणा केला. मात्र, पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केले.

सिंग यांच्या गाडीचाच वापर करत लावली त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट –

खून केल्यानंतर सिंग यांचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळुन बेडशीटमध्ये बांधून त्यांच्याच ब्रेझा गाडीत टाकला. पुढे राजेश पवार व समाधान म्हस्के यांनी त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ताम्हीणी घाटात धबधब्या जवळच्या नाल्यात टाकून व गाडी माणगाव एम.आय.डी.सी. परिसरात सोडली असल्याचे सांगितले.

Pune News : किशोर छाब्रिया यांच्या उपोषणाचा आज सोळावा दिवस; उपोषणामुळे प्रकृती खालावली

आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावलेले ठिकाण व गाडी सोडल्याचे ठिकाण दाखवून दिले. त्याप्रमाणे पोलीसांनी मयत इसमाचा मृतदेह व गाडी ताब्यात घेतली आहे.

हि कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, कृष्णदेव खराडे व पोलीस निरिक्षक गुन्हे प्रकाश जाधव, पोलिस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस उप-निरीक्षक शंभु रणवरे, गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अंमलदार जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, देवा राऊत जमिर तांबोळी, संतोष इंगळे, सागर अवसरे, विपुल जाधव, आतिष कुडके चिंचवड पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार पांडुरंग जगताप, धर्मनाथ तोडकर, पंकज बदाणे, उमेश वानखेडे यांच्या पथकाने कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.