Kelgaon : सिद्धबेटामध्ये आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा केळगाव (Kelgaon) येथील मुख्याध्यापिका सुनीता भगत, मधुकर आढारी, मनीषा मटाले, अलका राहणे, नेहा लगड, स्मिता तावरे, शरद कुऱ्हाडे इत्यादी शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सिद्धबेट येथे स्वच्छता मोहीम राबवली.

यादरम्यान विद्यार्थ्यांना सिद्धबेटाचे ऐतिहासिक व अध्यात्मिक महत्व सांगण्यात आले. सिद्धबेटास भेट देणाऱ्या पर्यटकांनी या ठिकाणी कचरा करू नये. परिसर स्वच्छ ठेवावा अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.

Wakad News : येथून दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुससह तरुणाला अटक

प्लॅस्टिक टाळा पर्यावरण वाचवा, प्रदूषणाचे दहन पर्यावरण संवर्धन, स्वच्छ परिसर सुंदर परिसर, आपले सिद्धबेट स्वच्छ सिद्धबेट अशा (Kelgaon) घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या. उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल मुंगसे उपाध्यक्ष अर्चना म्हस्के व सर्व सदस्य ,सरपंच गुंफाताई ठाकर उपसरपंच लताबाई विरकर , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.