Pune News : महाविकास आघाडी विधानसभेत 200 आणि लोकसभेत 40 जागा जिंकेल : संजय राऊत 

एमपीसी न्यूज- आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित राहिलो, तर कसबा मतदारसंघाचा निकाल लागतो आणि बंडखोरी झाल्यावर चिंचवड प्रमाणे निकाल लागतो. दोन्ही मतदारसंघातील नागरिकांनी दिलेला हा धडा आहे. राज्याच्या राजकीय भविष्यासाठी कसबा मतदार संघाचा निकाल मार्गदर्शक आहे.महाविकास आघाडीने मजबुतीने काम केल्यावर,तसेच एकजुट दाखविल्यास 2024 मध्ये विधानसभेत महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा अधिक जागा जिंकून येतील.तसेच लोकसभेच्या (Pune News) किमान 40 जागा आम्ही निश्चित जिंकू अशी भूमिका,  पुणे दौर्‍यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांंनी आज  प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना मांडली .
 ते म्हणाले , चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आमच्या सर्वांकडून काही बाबतीत चूक झाली आहे.चिंचवडचा विजय हा भाजपचा नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्ष जगताप पॅटर्न चालतो. तर तो विजय जगताप पॅटर्नचा आहे.तसेच आम्ही जर उमेदवार निवडताना अधिक काळजी घेतली असती.त्याचबरोबर बंडखोर कलाटे यांना माघार घेण्यास लावू शकलो असतो ,तर त्या ठिकाणी देखील वेगळा निकाल लागला असता अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सत्तेच,दर्शन,प्रदर्शन,विकृती हे सगळं होऊन देखील सुजाण मतदारांनी सत्ताधाऱ्यांनी एक चपराक दिली आहे.त्यापासून त्यांनी धडा घेतला पाहिजे. पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला.पण त्या आमिषाला पुणेकर बळी पडले नाहीत.त्यामुळे पुणेकर नागरिक अभिनंदनास पात्र आहेत.

घराघरात पैशांची पाकीट फेकण्यात आली.काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर हा साधा कार्यकर्ता असून हे त्याच काम नाही.तरी देखील या राज्यकर्त्यांची धनशक्ती नागरिकांनी लाथाडली. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या सह संपूर्ण कॅबिनेट कसबा मतदारसंघात बसून राहिले.ते देखील नागरिकांनी नाकारले आहे.त्यामुळे ही सुरवात कसबा तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी, अशा शब्दात शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल मला काही माहिती नाही.जर हल्ले होत असतील.तर गृहमंत्र्यांनी त्या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे ,अशी मागणी संजय राऊत (Pune News) यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.