Charholi News : इंद्रायणी नदीची जलपर्णीमुळे दुर्दशा; चऱ्होलीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात – विनया तापकीर

एमपीसी न्यूज – तीर्थक्षेत्र देहूकडून मोशी मार्गे आळंदीकडे (Charholi News) वाहत असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीवर सध्या मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरली असल्यामुळे नदीला खेळाच्या मैदानाचे स्वरूप आले आहे. यामुळे नदीपात्रालगत वसलेल्या चऱ्होली भागाला याचा मोठा फटका बसत आहे. जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याशिवाय पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी माजी नगरसेविका विनया तापकीर यांनी केली आहे.

इंद्रायणीच्या चिखली ते आळंदी या 18 किलो मीटर पर्यंतच्या पात्रामध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदी प्रदूषित झाली आहे. इंद्रायणी नदीपात्रामध्ये जलपर्णीची अगदी झालर पसरली आहे. याचा फटका मोशी, डुडळगाव, वडमुखवाडी, चऱ्होली आदी परिसरातील नागरिकांना बसला आहे. पावसाळ्यापूर्वी नदीतील जलपर्णी काढण्यात आली नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. या जलपर्णीमुळे डेंगी, चिकुणगुणिया या रोगांचा प्रादूर्भाव वाढतो. या डासामुळे हिवतापसारख्या रोगांचा प्रादूर्भाव होत असतो.

डासांमुळे होणारे डेंगी, चिकनगुणिया सारखे महाभयंकर आजारांमुळे महापालिकेचे दवाखाने दरवर्षी भरतात. नदीपात्रच्या आजुबाजूच्या विहिरींमध्ये हेच मैलामिश्रित पाणी पाझरत आहे. या विहिरीतील पाणी शेती  (Charholi News) पिकविण्यासाठी वापर केला जात असून शेतकरी वर्गाकडून हेच रसायन मिश्रीत पाणी शेतीला वापरले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नदी पात्रात वेगाने वाढणारी जलपर्णी ही मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. जलपर्णीमुळे होणारे डास व त्यापासून उद्भवणारे नाना प्रकारचे रोग यावर पालिकेचा अमाप पैसा खर्च होत असतो. यासाठी ठेकेदार नेमले जातात. मात्र या ठेकेदारांवर कोणाचा अंकुश दिसून येत नाही. अन्यथा नदी स्वच्छ होऊन वाहती राहिली असती. असे या भागातील रहिवाशी सांगत आहे. त्यामुले जलपर्णीचा ठेका कश्यासाठी ?सर्व सामान्य नागरिकांसाठी का राजकीय मंडळींसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या तळवडेपासून चऱ्होली पर्यंत इंद्रायणीनदी वाहते. हे संपूर्ण पात्र कमी अधिक प्रमाणात जलपर्णीने व्यापलेले आहेत. जलपर्णीचा हा वेढा येथील प्रत्येकालाच घातक ठरत आहे. मात्र तरीही प्रशासनाची अशी डोळेझाक का, चऱ्होली मधील नागरिक या समस्येला वैतागले आहेत. जलपर्णी काढण्यासाठी ठेका काढला जातो. पण, जलपर्णी का निघत नाही हे प्रशासनाने पाहिले पाहिजे. नदीच्या अशा अवस्थेला कारणीभूत असलेल्या पिंपरी-चिंचवड प्रशासनाचा करेल तेवढा निषेध कमी असल्याचे तापकीर म्हणाल्या.

Kelgaon : सिद्धबेटामध्ये आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.