Khed : दारू पिताना झालेल्या वादातून मित्रावर वार

एमपीसी न्यूज – दारू पिताना झालेल्या वादातून मित्रावर धारदार शस्त्राने (Khed) वार केले. ही घटना सोमवारी (दि. 31) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वासुली गाव येथे दशरथ बबनराव पानमंद यांच्या साईटवर घडली.

सुनील श्रीकृष्ण पटेल असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बिजित हरिपद बाईन (वय 45, रा. वासुली गाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ कन्हैया राय (वय 24, रा. पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Wakad : हॉर्न वाजवला म्हणून पीएमपीएमएल बस वाहकास बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील पटेल आणि सोमनाथ राय हे सोमवारी (Khed) मध्यरात्री दशरथ बबनराव पानमंद यांच्या बांधकाम साईटवर दारू प्यायला बसले होते. त्यावेळी त्यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला. त्यातून सोमनाथ याने सुनील यांना धारदार वस्तूने पोटात मारून गंभीर जखमी केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.