Kiwale Hoarding Accident News : किवळे होर्डिंग दुर्घटना प्रकरणी जागा मालकाला अटक

एमपीसी न्यूज – बेंगलोर-मुंबई महामार्गालगत किवळे येथे सोमवारी (दि. 17) सायंकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजता भलामोठा अनधिकृत होर्डिंग कोसळून पाचजण ठार झाले. तर तिघेजण गंभीर( Kiwale Hoarding Accident News) जखमी झाले. याप्रकरणी जागा मालक, होर्डिंग बनवणारा, होर्डिंग भाड्याने घेणारा आणि जाहिरात देणारी कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जागा मालकाला अटक केली आहे.
जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यासह होर्डिंग बनवणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 304 (2), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा हैदराबाद वर करारा विजय; कॅमेरून ग्रीन परिपूर्ण अष्टपैलूची खेळी

शोभा विजय टाक (वय 50, रा. पारशी चाळ, देहूरोड), वर्षा विलास केदारी (वय 50, रा. गांधीनगर, देहूरोड), रामअवध प्रल्हाद आत्मज (वय 29, रा. उत्तर प्रदेश), भारती नितीन मंचल (वय 33, रा. मामुर्डी), अनिता उमेश रॉय (वय 45, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विशाल शिवशंकर यादव (वय 20, रा. उत्तर प्रदेश), रहमद मोहमद अन्सारी (वय 21, रा. बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे), रिंकी दिलीप रॉय (वय 45, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी होर्डिंग बसवताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेतली नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता केली नाही. वादळे आणि मुसळधार पाऊस यांचा अंदाज असताना देखील सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेता होर्डिंग लावले. मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळामध्ये होर्डिंग कोसळून त्याखाली पाचजण ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
हे सर्व कामगार वादळ आल्याने होर्डिंगच्या खाली असलेल्या पंक्चरच्या दुकानात आडोशाला थांबले होते. अचानक होर्डिंग कोसळल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आरोपींना पकडण्यासाठी रावेत पोलिसांनी पथके तयार केली असून जागा मालकाला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींच्या मागावर पोलीस आहेत. रावेत पोलीस तपास( Kiwale Hoarding Accident News) करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.