Kivle Hording Accident : मृत्यूच्या काही क्षणाआधीचा फोन ठरला शेवटचा; मृत भारतीच्या पतीची प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज : किवळे येथे काल संध्याकाळी होर्डिंग खाली (Kivle Hording Accident) अडकून 4 महिलांचा मृत्यू झाला. यापैकी मृतक भारती(वय 33) यांचे आपल्या पतीसोबत फोनवर बोलणे झाले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. 

मामुर्डी येथे राहणाऱ्या नितीन मंचल यांच्या पत्नी भारती यांचे  होर्डिंग खाली अडकून निधन झाले. वातावरण बदलामुळे त्या कामावरून लवकर सुटल्या होत्या. त्यांनी आपले पती नितीन यांना फोन केला होता.

Pimpri News : अनधिकृत होर्डिंग, न्यायालयाचा ‘जैसे थे’चा आदेश आणि पाच जणांचा बळी

यावेळी नितीन यांनी मी टू व्हीलरवर घ्यायला येतो, असे म्हंटले असता, भारती यांनी (Kivle Hording Accident) नकार दिला. तर, मी आपल्या तीन मैत्रिणींसोबत येईल असे सांगितले. हा त्यांचा शेवटचा फोन आणि शेवटचे बोलणे ठरले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.