Kiwale : द्रुतगती मार्गावर इलेक्ट्रिक शिवनेरी बस आणि ट्रकचा अपघात

एमपीसी न्यूज – पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे येथे इलेक्ट्रिक (Kiwale)शिवनेरी बस आणि मालवाहू ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रक मधील प्लास्टिकचा कच्चा माल रस्त्यावर पडला असल्याने मुंबई पुणे लेनवर काही काळ वाहतूक कोंडी झाली.

ठाण्याहून स्वारगेटकडे जाणाऱ्या भरधाव इलेक्ट्रिक शिवनेरी(Kiwale) बसने (एमएच 01/ईई 5311) किवळे एक्झिट येथे मालवाहू ट्रकला पाठीमागून धडक दिली. यावेळी बस मध्ये 26 प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

 

Alandi : श्री गणेश जयंती निमित्त शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
मालवाहू ट्रक मुंबईहून सांगलीच्या दिशेने जात होता. ट्रक मध्ये प्लास्टिक भरले होते. अपघातात ट्रक पलटी झाला. त्यामुळे ट्रक मधील सर्व प्लास्टिकचा माल रस्त्यावर पडला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रावेत पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातामुळे पुढे लेन वरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी रस्त्यावर पडलेले प्लास्टिक बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.