Alandi : श्री गणेश जयंती निमित्त शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज –  काल  दि.13 रोजी श्री गणेश जयंती निमित्त शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने विविध( Alandi)   धार्मिक कार्यक्रम, श्रींची मिरवणूक, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी निदान व शस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

Bhosari :गाडीला कट मारला म्हणून दोघांना बेदम मारहाण

काल सकाळी साडे आठच्या सुमारास आळंदी मध्ये  पारंपरिक वाद्याने श्रींची मिरवणूक पार पडली. सकाळी 11 ते 1 या वेळेत  गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते.  गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे अयोजन करण्यात आले. त्यामध्ये 113 जणांनी रक्तदान केले. या दरम्यान देवस्थान विश्वस्त योगी निरंजनाथ व देवस्थान कर्मचारी वर्गाने उपस्थिती लावली होती.

तसेच मोफत नेत्र तपासणी निदान व शस्त्रक्रिया अभियानामध्ये 260 जणांचे नेत्र तपासले. त्यापैकी 22 जणांचे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी नारायणगाव येथे नेण्यात आले. सायंकाळी खास महिलांसाठी सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ  व ज्योतिषाचार्य आनंद पिंपळकर यांचे हसत खेळत राशीचक्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने यावेळी नागरिक उपस्थित होते.

तसेच रात्री श्रींची महाआरती करण्यात आली व प्रसादाचे वाटप करण्यात आले.अनेक भाविकांनी श्रींच्या  प्रसादाचा लाभ घेतला.या विविध  कार्यक्रमा वेळी शिवतेज मित मंडळा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम ( Alandi) घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.