Chinchwad : चापेकर बंधूच्या देशभक्तीचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे – अतिरिक्त आयुक्त जगताप  

एमपीसी न्यूज – थोर क्रांतिकारक हुतात्मा दामोदर हरी चापेकर यांचे भारतमातेवरील नितांत प्रेम, प्रखर देशभक्ती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द यांच्या सहाय्याने त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात 1897 साली पुण्याचे प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांची हत्या करून देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी कामगिरी केली आहे. चापेकर बंधूच्या महान देशभक्तीचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारक हुतात्मा दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या चिंचवड येथील चापेकर बंधूच्या समूह शिल्पास अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी जगताप बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, माजी नगरसदस्य सुरेश भोईर, अॅड. मोरेश्वर शेडगे, माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, सहाय्यक आरोग्याधिकारी महादेव शिंदे, जनसंपर्क विभागाचे माहिती अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, मधुसूदन जाधव, व्यवस्थापक अतुल आडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

AAP : किवळे दुर्घटनेप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा – आपची मागणी

अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, चिंचवड येथील दामोदर हरी चापेकर यांनी बाळकृष्ण आणि वासुदेव या बंधूच्या साथीने पुण्यातील गणेशखिंड येथे 22 जून 1897 रोजी जुलमी अधिकारी रँड आणि आयरिस्ट यांची हत्या केली आणि देशातील स्वातंत्र्यसैनिकांना, देशभक्तांना प्रेरणा दिली. या कृतीमुळे इंग्रजी सरकारने तीनही बंधूंना व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशीची शिक्षा दिली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एकाच घरातील तीन तरुण देशासाठी  फासावर जाण्याची ही जगातील एकमेव घटना आहे.

महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड गाव येथे क्रांतिकारक हुतात्मा चापेकर बंधूंचे समूहशिल्प उभारण्यात आले आहे. तसेच श्रीराम आळी परिसरात चापेकारांचा जुना वाडा असून तेथे (Chinchwad) भव्य स्मारक उभारण्यात येत असून त्यांनी वापरलेल्या वस्तू आजही वाड्यात जतन करून ठेवलेल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.