AAP : किवळे दुर्घटनेप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा – आपची मागणी

एमपीसी न्यूज – किवळेतील होर्डिंग दुर्घटनेला (AAP) जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

आपचे कमलेश रणावरे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात विविध प्रभागात मोठमोठी होर्डिंग लावताना कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन केले जात नाही. प्रचंड फॅब्रिकेटेड लोखंडी होर्डिंग सार्वजनिक ठिकाणी लावलेली असतात. मुळात ही होर्डिंग वादळ वाऱ्याच्या वेगाला तग धरून राहतील किंवा ती गर्दीच्या ठिकाणी असता कामा नये, अशी काळजी घेणे मनपा आकाशचिन्ह विभागाचे काम आहे.

होर्डिंग कोसळून किवळे येथे 5 नागरिकांचे हकनाक जीव गेले आहेत. या घटनेला महापालिका प्रशासन आणि आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. या दुर्दैवी घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

Nigdi News : अजितदादांचा थेट पीएमआरडीएच्या आयुक्तांना फोन, म्हणाले…

महापालिकेने परवानगी दिलेले होर्डिंग मुख्य रस्त्यांपासून (AAP) शंभर फूट लांब असावेत. जेणेकरून, ते कोसळले तर रस्त्यावरती किंवा फुटपाथ वरती असणाऱ्या लोकांना त्याची हानी पोहोचू नये. होर्डिंगच्या आसपास कुठलीही रहिवासी सदनिका असू नये जेणेकरून वादळी वाऱ्यामध्ये त्या सदनिकेला व सदनिकेमध्ये राहणाऱ्या लोकांना इजा होऊ नये किंवा त्यांचा जीव जाऊ नये.

शहरातील सर्व अनाधिकृत होर्डिंग काढून टाकावेत. सर्व अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांना रीतसर परवाना द्यावा. या घटनेमध्ये जबाबदार अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत व जखमी लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी आपच्या वतीने चेतन बेंद्रे, ब्रम्हानंद जाधव, रोहित सरनोबत, डॉ. अमर डोंगरे आणि सीताताई केंद्रे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.