Kivle Hording News : होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून तीन लाखांची मदत जाहीर

एमपीसी न्यूज – बेंगलोर-मुंबई महामार्गालगत (Kivle Hording News) किवळे येथे भलामोठा अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जण ठार झाले. तर, तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 17) सायंकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजता घडली. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल –

होर्डिंग दुर्घटना प्रकरणात जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे, होर्डिंग बनवणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 304 (2), 34 नुसार रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच ठार, तिघेजण जखमी

शोभा विजय टाक (वय 50, रा. पारशी चाळ, देहूरोड), वर्षा विलास केदारी (वय 50, रा. गांधीनगर, देहूरोड), रामअवध प्रल्हाद आत्मज (वय 29, रा. उत्तर प्रदेश), भारती नितीन मंचल (वय 33, रा. मामुर्डी), अनिता उमेश रॉय (वय 45, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विशाल शिवशंकर यादव (वय 20, रा. उत्तर प्रदेश), रहमद मोहमद अन्सारी (वय 21, रा. बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे), रिंकी दिलीप रॉय (वय 45, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत.

Pune Weather : आज पुण्यात कमाल 39 अंश सेल्सिअस तापमान; तर संध्याकाळी मेघगर्जनेची शक्यता

या (Kivle Hording News) घटनेतील मृत्यू झालेल्या व्यक्ती आणि जखमी जवळच असलेल्या एका बांधकाम साइटवर काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाल्याने किवळे येथे एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांना लवकर सोडण्यात आले होते. घरी जात असताना अचानक सोसायट्याचा वारा आल्याने हे कामगार एका पंक्चरच्या दुकानामध्ये आडोशाला थांबले. त्याचवेळी मोठा होर्डिंग कोसळून ही दुर्दैवी घटना घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.