Pimpri : ग्रेस मार्क देत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यास पावले उचलावीत

एमपीसी न्यूज –  दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनावरील मानसिक ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने ग्रेस मार्क पुन्हा सुरु करत मुलांना आत्महत्येपासून परावृत्त करावे,(Pimpri) अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारीणी सदस्य प्रदीप नाईक यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच दहावी – बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्या आहेत. या कालावधित मुलांवर परिक्षेच्या गुणांचा ताण आहे. लॉक डाऊन तसेच आठवी पर्यंत परिक्षा नसल्यामुळे मुलांना परिक्षा न देता उत्तिर्ण होत आहेत. त्यानंतर 9 वी व 10 वी मध्ये येताच त्यांना परिक्षांची तयारी करावी लागते. याचा ताण मुलांवर येत असल्याने त्यांची मानसीक स्थिती  कमकुवत झाली. त्यांच्यावर दहावी व बारावी मध्ये येताच आभ्यासाचा बोजा पडतो.

ST News : महिन्याभरात 4 कोटी 22 लाख महिलांनी काढले हाफ तिकीट

ग्रेस मार्क पद्धती नसल्यामुळे 1 ते 2 गुणांमुळे मुले नापास होतात व पुढे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यांना या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी शासनाने पुन्हा ग्रेस पद्धती सुरु करावी, यात 10 मार्क वाढवून द्यावेत, तसेच विद्यार्थ्यांचे पेपर शिक्षकांच्या घरी न पाठवता ते एखाद्या शासकीय (Pimpri) कार्यालयात एकत्र तपासावेत, बोर्डाने विद्यार्थ्यांशी तसेच महाविद्यालयाने ही विद्यार्थ्यांसी सौजन्याने वागावे व 1 किंवा 2 मार्कांसाठी त्यांना नापास करत त्यांचे खच्चीकरण करु नये अशी मागणी नाईक यांनी या  निवेदनात केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.