Pune News : काहीही झाले तर माझ्या भावावरच खापर फुटते – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : अजितदादा मंत्रालयात (Pune News) असून माझ्या बिचार्‍या दादाच्या बाबतीत असं झालं आहे, की काहीही झाले की माझ्या भावाच्या डोक्यावर त्याच खापर पडतं. पण, मार्केटमध्ये जे नाणे चालते, त्याचीच जास्त चर्चा सुरू असते. त्यामुळे मला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे भूकंप झाला, तर तो पवार साहेबांनी केला. पण त्या भूकंपामध्ये बिचार्‍या पवार साहेबांची काय चूक आहे? अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात मांडली.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपासोबत जातील अशी चर्चा सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार नॉट रिचेबल असून 40 आमदार नाराज देखील आहेत. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. सुप्रिया सुळे या पुण्यातील वेताळ टेकडीची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी अजितदादाचं ट्विटर आणि फेसबुकच पाहिले नाही. ते पाहिल्यावर त्यावर भूमिका मांडते. तसेच 40 आमदार कोणत्या बाबतीत नाराज आहेत? तुमचं लग्न झाले आहे का? असा प्रश्न समोरील एका पत्रकाराला विचारला.

त्यावर एकच हशा पिकला. मी नातं का लावते? तर बायको नाराज झाल्यावर सोडून जाते की, रुसून बसते. त्यामुळे तुमच्या म्हणण्याला जर काही तथ्य असेल, तर मी नक्कीच नाराज असलेल्या 40 आमदारासोबत चर्चा करेल अशी भूमिका त्यांनी मांडली.

Pimpri : ग्रेस मार्क देत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यास पावले उचलावीत

तसेच, त्या पुढे म्हणाल्या की मी नेहमी सर्व आमदार आणि खासदार यांच्या संपर्कात असते. तसेच, पवार साहेब, दादा आणि जयंत पाटील हे देखील 24 तास सर्वांच्या संपर्कात असतात. त्यामुळे जर एखादा कोणी नाराज असता, तर ते आमच्या कानावर निश्चित आले असते. त्यामुळे एकूणच आमच्या कोणाच्याही (Pune News) मनात अनिश्चितता नसून टीव्हीवर अनिश्चितता जास्त वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.