Dighi : पतीच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीच्या जाचाला कंटाळून महिलेने (Dighi) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 16) सायंकाळी चौधरी पार्क, दिघी येथे घडली.

पती सोमनाथ बबन साकोरे (वय 40, रा. चौधरी पार्क, दिघी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मयत 36 वर्षीय विवाहितेच्या भावाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : ग्रेस मार्क देत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यास पावले उचलावीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि फिर्यादी यांच्या बहिणीचा सन 2004 मध्ये विवाह झाला. त्यांनतर घरगुती कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सोमनाथ याने पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला.(Dighi) या छळाला कंटाळून विवाहितेने रविवारी रात्री राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने घराच्या छताच्या तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.