Alandi : आळंदीमध्ये अग्निशमन दलाच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथे उन्हाळा ऋतू व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सन 2023 च्या अनुषंगाने स्कोडा फोक्सवैगन ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अग्निशमन दलाचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.

अग्निशामक दलाचे अधिकारी अमित डफळ, सूरज शिंदे, रोहित महाजन, अजिंक्य मुंगसे यांनी आज सकाळी पावणे आकरा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आगीचे प्रकार व त्यापासून बचाव करण्याबाबत माहिती दिली.

Pune News : काहीही झाले तर माझ्या भावावरच खापर फुटते – सुप्रिया सुळे

यासोबतच त्यांनी त्याची प्रात्यक्षिकेही सादर केली. तसेच, अग्निशमन दलाच्या विविध उपकरणाबाबत माहिती ही यावेळी देण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी आग लागल्यास काय करावे व काय करू नये? याबाबतही माहिती देण्यात आली.

आळंदी (Alandi) पोलीस स्टेशन, दिघी आळंदी वाहतूक विभाग, नगरपरिषदमधील अधिकारी व कर्मचारी तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे व्यवस्थापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.