Pune : उन्हाचा कडाका वाढला, पुणे शहर व परिसराचे तापमान 40 अंशाच्या पुढे

एमपीसी न्यूज –  राज्यात काही ठिकाणी  अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असली तरी राज्यात अवकाळीचे ढग गायब झाले असून कमाल तापमानात वाढ होत असताना दिसून येत आहे.

आज दि. (15 एप्रिल) रोजी पुणे शहर आणि परिसराचे तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे.  वडगाव शेरी  येथे सर्वाधिक 42.9 अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, लावासा येथे 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे.

आज  वडगाव शेरी येथे 42.9, हडपसरमध्ये 41.8, कोरेगाव पार्क 42.8, शिरूर 42.3, चिंचवडमध्ये 41.9,  राजगुरुनगरमध्ये 41.9, पुरंदरमध्ये 41.4,  एनडीएत 40.4, मगरपट्ट्यात 40.8, खेडमध्ये 41.2, पाषाणमध्ये 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

तसेच शिवाजीनगरमध्ये (Pune) यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. इंदापूर 39.1,  तळेगावात 41.9, दौंडमध्ये 39.5,  हवेलीत 38.8  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार,पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहण्याचा आणि तापमानातील वाढ कायम राहण्याचा शक्यता आहे.

IMD : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस. भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर

पुणे शहर व परिसराचे  आज नोंद झालेले तापमान  खालील तक्त्यात नमूद केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.