Pune : गारवा हरवला, उकाडा वाढला; पुण्याचा पारा 39.9 अंशाच्या पार तर पिंपरी-चिंचवडमध्ये 41.5 अंशाची नोंद

एमपीसी न्यूज : राज्यात विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात चढ-उतार होत असताना दिसत आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मागील 2 दिवसांपासून गारपिटीचा तडाखा बसलेला आहे. महाराष्ट्रातील इतर भागातही उन्हामुळे नागरिक हैराण झालेले दिसून येत आहे.

आज (दि. 14)  रोजी वातावरणातील बदलांमुळे पुण्यातील तापमानाचा पारा 39.9 अंशांच्या पुढे सरकला असल्यामुळे दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके आणि उकाडा वाढला आहे. आज  दिवसभरात तापमानात वाढ होऊन  पुण्यात कमाल 39.9  अंश तापमानाची  नोंद झाली असून पिंपरी-चिंचवडमध्ये  41.5 अंशाची नोंद झाली आहे.

Pune : तुळशीबाग राम मंदिरात सजली सुखानुभूती देणारी अभिषेकी बुवांची स्वर मैफील

हवामान विभागाने महिन्यात यंदा उन्हाची तीव्रता (Pune) अधिक राहणार असून, उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वातावरणात कोरडेपणा असल्यामुळे सकाळी हवेत गारवा व दुपारी उष्णता जाणवत आहे. पुणे  जिल्ह्यातील लवळे येथे  सर्वात जास्त  तापमानाची नोंद झाली असून  (41.8 अंश सेल्सिअस)  तर  लावासा येथे सर्वात कमी तापमानाची (35.4 अंश सेल्सिअस)  नोंद झालेली दिसून येत आहे .

पुणे जिल्ह्यातील इतर भागांमध्ये  नोंद झालेले  आजचे तापमान पुढीलप्रमाणे :

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.