PMPML : पीएमपीएल‌च्या चालकाने कामाच्या जबाबदारी सकट जपली माणूसकी

एमपीसी न्यूज :  पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसेसची संपूर्ण शहरात सुविधा आहे. सध्या शहरात उन्हाचा तडाका इतका वाढला आहे की, उन्हात थोडा वेळ जरी प्रवास केला तर अनेक नागरिकांना भोवळ येण्याचे प्रकार घडत आहेत. हे लक्षात घेता प्रवाशांना वेळेत पाणी मिळावे यासाठी पीएमपीएलच्या चालकाने चक्क थंड पाण्याचा माठ पीएमपीएल बसमध्ये  प्रवाशांच्या सोयीसाठी ठेवल्याचं पहायला मिळालं. पीएमपीएल‌च्या या चालकाने कामाच्या जबाबदारी सकट माणूसकीही जपली आहे.

पीएमपीएल बस सेवा ही शहरातील चांगली बस सेवा म्हणून ओळखली जाते. तसेच पीएमपीएल ने प्रवास करत असलेल्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे.(PMPML) लहानांपासून मोठ्यांपर्यंत या बस गाड्यांनी प्रवास करण्यास नागरिक प्राधान्य देतात. सर्वाधिक प्रमाण हे विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे आहे. पीएमपीएल बस गाड्यांमध्ये तिकिटाचे दरही परवडणारे आहे. त्यामुळे या बस सेवेचा लाभ असंख्य घेताना नागरिक दिसतात. तसेच बसमध्ये देखील स्वच्छता चांगली , सुखकर असल्यामुळे प्रवास चांगला होतो. मात्र वाढत्या उन्हाळ्यात घराबाहेर जाणे अनेक जण टाळतात. पण पीएमपीएलच्या एका चालकाने चक्क नागरिकांच्या सोयीसाठी बसमध्ये पाण्याची सोय केली असल्यामूळे पीएमपीएल कर्मचाऱ्याने जबाबदारी सकट माणुसकी ही राखली असल्याचे दिसत आहे.

Pune : कचरामुक्त गाव मोहिमेंतर्गत 125 टन कचऱ्याचे संकलन

पूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येत होती. मात्र पाणपोईची संख्या आता कमी झाली असल्यामुळे राज्यभरातून ,जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना विकत पाणी घेऊन पाणी प्यावे लागते. त्यामुळे अनेकांचे हाल होतात. मात्र पीएमपीएलच्या बसमध्ये प्रवाशांच्या (PMPML) सोयीसाठी चालकाने पिण्याचे पाणी ठेवल्याने  प्रवाशांमध्ये आनंद दिसून येत आहे. अशा चांगल्या सुविधेमुळे पीएमपीएल प्रथम वाहतूक सेवा नक्कीच होऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.