Pune : कचरामुक्त गाव मोहिमेंतर्गत 125 टन कचऱ्याचे संकलन

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये कचरामुक्त गाव ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली.(Pune) गावाच्या परिसरातील, रस्त्याच्या कडेला आणि अडगळीच्या ठिकाणी वर्षानुवर्ष साठलेला कचरा, तसेच प्लॅस्टिक असा एकूण 125.82 टन कचरा गोळा करण्यात आला. हा जमा झालेला कचरा  कचरा प्रक्रिया केंद्रांकडे पाठविण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये जमा झालेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यात कचरामुक्त गाव ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरवात महाराष्ट्रदिनी करण्यात आली. गोळा केलेला कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गावस्तरावर कार्यरत प्रकल्प केंद्राचे ठिकाणी प्रक्रियेसाठी पाठविण्यात आलेला आहे. गावात वर्दळीच्या ठिकाणी, सार्वजनिक बस स्थानके, धार्मिक स्थळे,  ऐतिहासिक ठिकाणी, दुकाने, बाजार, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो.

Pune : राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं जमतं काय-अजित पवार

उघड्यावर साठलेल्या कचऱ्यामुळे सार्वजनिक आरोग्यास आणि पर्यावरणास धोका पोहोचतो. त्यामुळे 1 मेपासून जिल्ह्यातील सर्वच 1845 गावांत कचरामुक्त ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये गावातील महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी यांच्या लोकसहभागातून श्रमदान घेण्यात येत आहे.(Pune)  765 गावांमधील 89 हजार 302 ग्रामस्थ या मोहिमेत सहभागी झाले असून 125.82 टन कचरा गोळा करण्यात आला, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.