Pune : राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं जमतं काय-अजित पवार

एमपीसी न्यूज-पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात दोन (Pune) दिवसापूर्वी व्यंगचित्र महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या महोत्सवाचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते.त्यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच व्यंगचित्र काढले होते.त्या व्यंगचित्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू होती.

त्याच दरम्यान रत्नागिरी येथे काल झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली.या दोन्ही गोष्टीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं ? मिमिक्री करण हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे.जनतेने त्यांना नाकारले आहे. पक्षामधून बाहेर पडल्यावर (शिवसेनेमधून) 14 आमदार पहिल्यांदा निवडून आणले.

 

Wakad : बेकरीतील कामगारांचा वाद; एकाचा मृत्यू

 

त्यानंतर दुसर्‍या वेळेस जुन्नर येथील शरद सोनवणे निवडून आले आणि आता 2019 च्या निवडणुकीत कल्याण येथील राजू पाटील हे निवडून आले आहे.तसेच त्यावेळचे काही जण सोडले.तर अनेक जण त्यांना सोडून दूर गेले आहेत.त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी माझ्यावर मिमिक्री करणं आणि माझे व्यंगचित्र काढण्यात त्यांना समाधान वाटत आहे.यातून ते समाधानी होत असतील तर त्यांना माझ्याकडून शुभेच्छा , असा टोला राज ठाकरे यांना (Pune) अजित पवारांनी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.