PCMC : अखेर आकाशचिन्ह परवाना विभागाचा पदभार सोपविला दुस-या अधिका-याकडे

एमपीसी न्यूज – किवळेत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली असताना आकाश चिन्ह व परवाना विभागाचे सहाय्यक रजेवर असल्याने (PCMC) प्रशासनावर टीकेची झोड उडाली होती. अखेरीस प्रशासनाने या विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांच्या रजा काळात कर आकारणी व करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभागाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी 13 एप्रिल रोजी उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात मोठे फेरवाटप केले. या फेरवाटपामुळे अनेक अधिकारी नाराज झाल्याचे असल्याचे सांगितले जाते. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी बदलीसाठी प्रयत्न करत आहेत. त्याकरिता अनेक जण रजेवर गेले आहेत.

Pune : कारागृहावर आता ड्रोनची नजर

या फेरबदलात उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडील आकाश चिन्ह व परवाना विभाग काढून त्यांच्याकडे भूमी आणि जिंदगी विभाग दिला. हा विभाग सोपविल्यापासून ढोले रजेवर आहेत.(PCMC) तर, भूमी आणि जिंदगी विभागाचे प्रशांत जोशी यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभागाची जबाबदारी सोपविली आहे. जोशी हे देखील 17 ते 21 एप्रिल दरम्यान रजेवर गेले आहेत.

सोमवारी किवळेत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. पण, या विभागाचे अधिकारी रजेवर होते. पदभार देखील कोणाकडे दिला नव्हता. (PCMC) त्यामुळे प्रशासनावर टीकेची झोड उडाली होती. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी जोशी यांच्या रजा काळात आकाश चिन्ह व परवाना विभागाचे कामकाज कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे सोपविला. देशमुख यांनी कर संकलनसह अतिरिक्त कामकाज करावे. कामकाजाच्या अनुषंगाने प्रदान केलेले अधिकार वापरावेत, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.