IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा हैदराबाद वर करारा विजय; कॅमेरून ग्रीन परिपूर्ण अष्टपैलूची खेळी

एमपीसी न्यूज – 18 एप्रिल 2019 ला झालेल्या आयपीएलच्या सामन्यामध्ये (IPL 2023 ) मुंबई इंडियन्स ने सनरायझर्स हैदराबाद यांना 14 धावांनी हरवले. मुंबईने स्वतःचे पाच पैकी तीन सामने आता जिंकले आहेत तर काल हैदराबादने स्वतःचा तिसऱ्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारला. मुंबई इंडियन्स कडून सलग दुसरा सामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकर याला संधी मिळाली. सनरायझर्स हैदराबादने स्वतःच्या घरेलू राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला.

पहिली फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात पुन्हा एकदा चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा यांनी 18 चेंडूंमध्ये 28 धावांचे योगदान दिले तर ईशान किशन ने 31 चेंडूंमध्ये मध्ये 38 धावा काढल्या. त्यानंतर आलेला अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याने उत्कृष्ट केळी करत 40 चेंडूंमध्ये 67 धावा काढल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव (7 धावा), तिलक वर्मा (37 धावा) आणि टीम डेव्हिड (16 धावा) यांच्या फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्स 192 या धावसंख्येपर्यंत पोहोचली. हैदराबाद चिखल गोलंदाजी फारच दुर्मिळ आणि असंतुलित दिसत होती. त्यांच्याकडून गोलंदाजी करताना मार्को जानसेन याने 2 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

 

MPC News Podcast 19 April 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

193 धावांचा पाठलाग करताना हॅरी ब्रूक (9 धावा)  हा लवकरच बाद झाला. परंतु ब्रूक चा जोडीदार मयंक अगरवाल याने सनरायझर्स हैदराबादची पारी सांभाळत 41 चेंदूनमध्ये मध्ये 48 धावा काढल्या.  राहुल त्रिपाठी (7 धावा) आणि अभिषेक शर्मा (1 धाव) हे काही जास्त करू शकले नाहीत. कर्णधार एडन मार्करम (22) आणि हेणरीच कलासेन (36) यांनी चांगले कॅमियो दाखवले. परंतु यांचे फलंदाजी कमी पडल्याने हैदराबाद धावसंख्येचा पाठलाग करताना 14 धावांनी कमी पडले. मुंबई कडून गोलंदाजीची सुरुवात करताना अर्जुन तेंडुलकर याने एक बळी घेतला. जेसन बेहरेनडॉर्फ आणि इम्पॅक्ट प्लेयर रिले मेरेडिथ यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. कॅमेरून ग्रीन याने पण 4 षटकांमध्ये फक्त 29 धावा देऊन एक बळी घेतला आणि तो सामनावीर ठरला.

 

मुंबई इंडियन्स यांच्या असंतुलित सुरुवातीनंतर आता त्यांचा संघ फारच सक्षम, मजबूत आणि संतुलित दिसत आहे. सचिन तेंडुलकर यांचे सुपुत्र अर्जुन तेंडुलकर याला सलग दुसऱ्या सामन्यांमध्ये संधी मिळाली असून तो त्या संधीचे सोने (IPL 2023 ) करत आहे. हैदराबाद अजूनही गोलंदाजी मध्ये आणि फलंदाजी मध्ये दुर्मिळ दिसत आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.