Pimpri news : शहराला पुढील 10 वर्षातील वाढती पाण्याची गरज भागविण्यासाठी जलपुनर्भरण आणि सांडपाण्यावर टर्शरी प्रक्रिया करावी लागेल

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराला पुढील 10 वर्षातील आपली वाढती पिण्याची गरज भागविण्यासाठी रस्त्याच्या कडेला जलपूनर्भरण आणि सांडपाण्यावर (Pimpri news) टर्शरी प्रक्रिया करावी लागेल असे अंतरराष्ट्रीय पाणी तज्ञ डॉ. पद्माकर केळकर आणि पाणी विशेषज्ञ प्रवीण लडकत यांनी सांगितले आहे.पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल(केव्हीआयएफएफ) आणि जल्दी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल(केव्हीआयएफएफ) 9 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत चालू आहे. आज गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या चर्चासत्रात पुढील 10 वर्षातील पाणी व्यवस्थापना मधील पिंपरी-चिंचवड महानगरपालिके पुढील आव्हाने, योजना आणि उपाय या विषयावर केळकर यांनी आपले मत मांडले. हे चर्चासत्र आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये आज दुपारी झाले. यामध्ये केळकर व प्रवीण लडकत, माजी सह शहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी त्यांचे या विषयावरील मत मांडले व उपस्थित विद्यार्थी व नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

सुरुवातीला लडकत यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत पिंपरी-चिंचवड शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत माहिती दिली.(Pimpri news) त्यांना सांगितले की सुमारे 560 दशलक्ष लिटर प्रति दिवस पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या विविध भागात असलेल्या 100 पाण्याच्या टाक्या  (ई एस आर ) मधून आणि 180 किलोमीटर पाण्याच्या पाईपलाईन जनरेटर मधून सुमारे 28 लाख लोक संख्येला पाणीपुरवठा दिला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा दशकीय वृद्धीदर 70 टक्के आहे म्हणजेच 7 टक्के प्रति वर्ष. भारतातील चोरांचा वार्षिक वृद्धीदर 2.3 ते 3 टक्के आहे.

Chandrakant Patil : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दोन अनाथांचे शैक्षणिक पालकत्व

शहराच्या वाढत्या लोकसंख्येची वाढती पिण्याचे पाण्याची गरज भागविण्यासाठी भामा आसखेड व आंध्र धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. हे पाणी चिखली येथील 300 दशलक्ष लिटर प्रति दिवस क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध करून शहरातील इंद्रायणी खोऱ्यातील भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सध्या पिंपर- चिंचवड महानगरपालिके मार्फत शहराला दिवसाआड पाणी देण्यात येत आहे पण भविष्यात 24×7 पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

नागरिकांना निर्जंतुकोषित पाणी मिळावे तसेच त्यांचे आरोग्य उत्तम राहावे हा 24×7 पाणीपुरवठा करण्यामागचा उद्देश्य आहे. लडकत सिंगापूर मध्ये सांडपाण्यावर टर्शरी प्रक्रिया करून ते पाणी पिण्यासाठी दिले जाते. तेथे 1 लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत 200 रुपये आहे.

पाण्याचे स्रोत मर्यादित असल्याने पिंपरी-चिंचवड शहराला सुद्धा त्याची वाढती पिण्याचे पाण्याची गरज भागविण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करावा लागेल. चिखली येथील एसटीपी च्या पाण्यावर प्रक्रिया करून ते ते पाणी उद्यानातील झाडांना दिले जाते.(Pimpri news) 6 रुपये प्रति 1000 लिटर हा सध्या धरणातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठीचा खर्च आहे. सांडपाण्यावर टर्शरी प्रक्रियेसाठीचा खर्च 200 रुपये प्रति 1000 लिटर आहे. भविष्यात पिंपरी-चिंचवड शहराला सुद्धा सांडपाण्यावर टर्शरी प्रक्रिया करून पाणी पिण्यासाठी वापरावे लागू शकते.

केळकर म्हणाले की सध्या फ्लॅश फ्लड्स – ढगफुटी सदृश्य पाऊस, मुळे पुर येऊन मोठी हानी होत आहे. सर्व पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून नदीत जाते व पुर येतो.(Pimpri news) त्यामुळे महानगरपालिकेने जलपुनर्भरण ( पावसाच्या पाण्याची साठवण ) करणे नागरिकांना बंधनकारक केले पाहिजे. तसेच प्रत्येक रस्त्यावर 200, 300, 400 मीटर अंतरावर खड्डे करावेत ज्यामध्ये पावसाचे पाणी साठेल व जलपुनर्भरण द्वारे भूजलपातळी वाढेल. जर जलपुनर्भरण प्रभावीपणे करण्यात आले तर शहराला 2050 पर्यंत पाण्याची कमतरता भेडसावणार नाही.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.