Leopard trapped : वन विभागाकडून कान्हूर मेसाईत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

एमपीसी न्यूज :  वन विभागाकडून कान्हूर मेसाईत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले आहे.या भागातील नागरिकांना वारंवार बिबट्या दिसत असे.(Leopard trapped) तसेच या बिबट्याने प्राण्यांवर हल्ला केला होता. अखेर वन विभागाने कान्हूर मेसाईत भाऊसाहेब शिंदे यांच्या शेतात पिंजरा लाऊन या बिबट्याला पकडले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे. 

कान्हूर मेसाई येथील ढगेवाडी येथे वारंवार बिबट्याचे नागरिकांना दर्शन होऊन कित्येकदा प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने येथे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. कान्हूर मेसाई मधील ढगेवाडी, तालुका शिरूर येथे मंगळवार, 1 नोव्हेंबर ला सकाळी सूर्यकांत ढगे, दत्ता शिंदे व दत्ता खर्डे हे त्यांच्या शेताकडे गेले असता त्यांना तेथील पिंजऱ्यात बिबट्या (Leopard trapped) अडकल्याचे दिसले.याबाबतची माहिती शिरूर वनपरिक्षेत अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळाल्यावर वनपाल ऋषिकेश लाड, वनरक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर हनुमंत कारकुड तेथे पोहोचले.

Women harrasement : सासरच्यांकडून विवाहीतेचा आर्थिक व मानसिक छळ, विवाहीतेची तक्रार

सूर्यकांत ढगे, दत्ता शिंदे, दत्ता खर्डे, अंकुश खर्डे, बाबुराव खर्डे, म्हातारबा खर्डे, रामभाऊ शिंदे व इतर नागरिकांच्या मदतीने त्या बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे. बिबट्याला पकडल्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ग्रामस्थ व नागरिक यांनी वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.