Lions Club International : विशेष मुलांची जिद्द आणि शिक्षक व पालकांची मेहनत मोलाची – रमेश शहा

एमपीसी न्यूज – विशेष विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे कार्यक्रम बसवून घेण्याचे काम जिकिरीचे असते. मात्र, शिक्षकांनी मेहनत घेऊन हे आव्हान लीलया पेलले आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच हा समूह नृत्याचा कार्यक्रम सुरेख झाला. विशेष मुलांची जिद्द आणि शिक्षक व पालकांची मेहनत यामध्ये मोलाची आहे, असे मत लायन्स क्लब इंटरनॅशनलचे (Lions Club International) माजी प्रांतपाल रमेश शहा यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब इंटरनॅशनल 3234 डी-2 मधील सहकारी क्लब आयोजित मतिमंद गट समूह नृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी शहा बोलत होते. स्पर्धेत 17 शाळेतून एकूण 250 विद्यार्थी सहभागी झाले होते. मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळा व कार्यशाळा अशा दोन गटासाठी स्पर्धा होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर सतीश राजहंस, सीमा दाबके, प्रतिभा खंडागळे, परिक्षक राजश्री नगरकर आणि मिथिला पंडित, कमल राजे, ललिता शिंदे, संध्या दहिवळे, ऋजुता पितळे, सुहास दाबके, माधुरी पंडीत, शमा गोयल उपस्थित होते.

Hadapsar Crime : तलवार व चाकूचा धाक दाखवून लुटणारी फरार आरोपी गजाआड

समूह नृत्य स्पर्धेत कार्यशाळा गटात ‘सेवासदन दिलासा एरंडवणे’ या गटाने (Lions Club International) प्रथम क्रमांक, ओम साई ओम या गटाने द्वितीय क्रमांक, तर माधवी ओगले (व्यावसायिक विभाग) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ बक्षीस साई संस्कार निगडी व नव क्षितिज कार्यशाळा यांनी मिळवले. शाळा गटात कामायनी निगडी शाळेने प्रथम, सेवासदन दिलासा लक्ष्मीरोडने द्वितीय, तर साई संस्कार निगडीने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ बक्षीस सेवाधाम व छत्रपती प्रतिष्ठानचे निवासी विद्यालय यांनी मिळवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.