Chakan Murder Case : जंगलात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उघडकीस; पती आणि सासऱ्यानेच केला खून

एमपीसी न्यूज- महिलेचा खून करून मृतदेह (Chakan Murder Case) निर्जनस्थळी पुरल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.6) उघडकीस आला आहे. मात्र, पोलिस तपासात हा खून पतीने व महिलेच्या सासऱ्याने केल्याचे उघड झाले असून चाकण पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे तर दोन जण अद्याप फरार आहेत.

गोरक्ष बबन देशमुख (वय 35, रा. मेदनकरवाडी) असे अटक पतीचे नाव असून रोशन गजानन भगत (वय 22, रा. मेदनकरवाडी) व बबन शिंवलींग देशमुख (वय 62 रा. अहमदनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. रोशन याचा मित्र रेवा व मुंडे असे दोघेजण अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोरक्ष याने 29 ऑगस्ट रोजी इतर आरोपींच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर चाकण आळंदी रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलात तो नेऊन पुरला. पुढे त्याने स्वतः वर संशय येवू नये यासाठी पोलीस ठाण्यात (Chakan Murder Case) जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

पुढे गोरक्षनेच 1 ऑक्टोबर रोजी प्रेत खड्ड्यातून बाहेर काढले व जाळले. मात्र, पाऊस पडत असल्याने प्रेत अर्धवट जळाले. त्यानंतर त्यांनी ते प्रेत फॉरेस्ट शेजारच्या तळ्यात फेकून दिले. परिसरात दुर्गंधी पसरताच पोलिसांना याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. यावेळी गळा आवळून खून झाल्याचे तपासणी रिपोर्टमध्ये येताच पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. 

पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तीघांना अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.